छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असे घोषित केले होते. त्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्याकडून पाठिंबा न मिळाल्याने संभाजी राजे निवडणुकीतून माघार घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता पत्रकार परिषद घेत संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मी ही निवडणूक लढवणार नाही, ही माघार नाही पण माझा स्वाभिमान आहे, असे संभाजी राजे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला
छत्रपती संभाजी राजे म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन खासदार माझ्याकडे पाठवले, मला शिवसेना पक्षात सहभागी होण्यास सांगितले. पण मी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मला मुख्यमंत्र्यांनी स्वत: फोन करुन बोलावले. मला पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करण्यास सांगितले. त्यानंतर मी त्यांना एक प्रस्ताव दिला, मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. मला महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी द्यावी. मी त्यांना बोललो की तुम्ही विचार करा मीही करतो, त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांचा फोन आला, बैठका झाल्या. शिष्टमंडळांच्या बैठका झाल्या. त्यात त्यांचे जवळचे स्नेही होते, त्यांनी मला म्हटलं की शिवसेनेत प्रवेश करा. त्यांनी मला शब्द दिला. त्यानंतर ऐकतो तर काय यांनी संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. हा काय प्रकार आहे म्हणून मी शिवसेनेच्या मंत्र्यांना फोन केला. मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला.
( हेही वाचा: “…तर वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही?”, शिवसेनेचा भाजपला सवाल )
Join Our WhatsApp Community