Chhatrapati Sambhajinagar : …अखेर औरंगाबादऐवजी ‘छत्रपती संभाजीनगर’ नामफलक सरकारी कार्यालयांत झळकले

220
Chhatrapati Sambhajinagar : ...अखेर औरंगाबादऐवजी 'छत्रपती संभाजीनगर' नामफलक सरकारी कार्यालयांत झळकले

छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात (Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (१६ सप्टेंबर) करण्यात आले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे (Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे अधिकृत नामांतरण होणार; राज्यसरकारकडून राजपत्र जारी)

यावेळी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) महसुली विभाग आणि धाराशिव जिल्हा, तालुका, गाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषामुळे परिसर दुमदुमून गेला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.