सरकारला जनाची नाही तर मनाचीही वाटत नाही का?; अजित पवार यांचा हल्लाबोल

94

उद्धव ठाकरेंच्या काळात दीड लाख लोक कामाला लागतील असे उद्योग इथे येत होते. यांचा पायगुण चांगला नाही. हे आल्यानंतर सगळे उद्योग परराज्यात गेले. दोष द्यायचा कुणाला? ७५ हजार नोकऱ्या आणणार म्हणाले, पण कधी भरणार? तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार चालू आहे. सर्वोच्च न्यायालय म्हटले की हे नपुंसक सरकार आहे. अरे या सरकारला काही जनाची नाही तर मनाचीही वाटत नाही का? या पद्धतीने हे सरकार चालवतायत का? यांच्या लोकांकडून अनेक महापुरुषांची बदनामी झाली. तेव्हा यांची दातखिळ बसली होती का?, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

सावरकरांबाबत काहीतरी बोलले गेले. पण वडिलकीच्या नात्याने समजावून सांगितल्यानंतर ते वातावरण निवळले. इथे गौरवयात्रा काढायला आमचा विरोध नाही. पण तुम्ही दुटप्पी राजकारण करता. छत्रपतींचे नाव घेऊन तुम्ही सत्तेत आला, पण त्यांचा अपमान झाला तेव्हा तुम्हाला राज्यपालांना थांबवता आले नाही. महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही. तुम्ही स्वत:ला सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणवता आणि मराठवाड्यातल्या जनतेचा अपमान करता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आम्ही मागणी केली की खास दोन दिवसांचे अधिवेशन बोलवा. पण तसा दिलदारपणा या मुख्यमंत्र्यांनी दाखवला नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा स्वातंत्र्यसैनिकांबाबत बोलायला किती वेळ दिला? १३ मिनीट? एवढी उपेक्षा मराठवाडा स्वातंत्र्यसेनानींसाठी इतर कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केली नसेल. तेवढी या मुख्यमंत्र्यांनी केली, अशी टीका अजित पवार यांनी केली.

(हेही वाचा होय! मी सावरकर; भाजपा-शिवसेनेच्या वतीने राज्यभर ‘सावरकर गौरव यात्रा’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.