
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मराठीतून ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले असून त्यांना आदरांजली वाहणारा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर केला आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)
हेही वाचा-१९ फेब्रुवारी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक Chhatrapati Shivaji Maharaj यांची तारखेनुसार जयंती
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.’
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.
त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी… pic.twitter.com/zu0vLviiPf
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2025
“माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही. हे फक्त राजा, महाराजा (Maharaja), राजपुरूष नाहीत, तर आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत (Adorable God) आहेत. आमच्यासाठी आराध्य देवापेक्षा मोठे काही असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजाचं शौर्य, विचारधारा आणि न्याय प्रियतेने अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे. त्यांची धाडसी कार्यशैली, सामरिक कौशल्य आणि शांततापूर्ण राजकीय पद्धती आजही आपल्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत.” (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)
हेही वाचा-Maharashtra Cabinet Decision: राज्यात सहावा वित्त आयोग स्थापन ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
“या गोष्टीचा अभिमान आहे की जगातील अनेक देशात आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणांची चर्चा होते आणि त्यावर संशोधन होत आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी स्थापित केलेली मूल्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी वाट दाखवत आहे. त्याच मूल्यांच्या आधारांवर आपल्याला अमृत काळाची २५ वर्षांची यात्रा पूर्ण करायची आहे. हा प्रवास असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत बनवण्याचा. ही वाटचाल असेल, स्वराज्य, सुशासन आणि आत्मनिर्भरतेची. मी छत्रपती शिवाजी महारजांच्या चरणी कोटी कोटी नमन करतो.” अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community