किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीला दुग्धाभिषेक

172
किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीला दुग्धाभिषेक
किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीला दुग्धाभिषेक

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्यांनी वयाच्या १६व्या वर्षी स्वराज्याची स्थापन करण्याचे ध्येय उराशी बाळगले असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५०वे वर्ष आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून किल्ले रायगडावर दिमाखदार सोहळा सुरू आहे. देशभरातून शिवप्रेमी किल्ले रायगडावर दाखल झाले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री रायगडावर दाखल झाले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच यावेळी सर्व शिवभक्तांना शपथ देण्यात आली.

(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार – मुख्यमंत्री)

३५० वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा भव्यदिव्य आणि अद्भूत होता. अनेक राजे, महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित होते. गागाभट्ट्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ संपन्न झाला होता. त्यावेळेला जे रिती-रिवाज केले गेले, त्याच परंपरेचे आणि पूजा-अर्चाचे पालन आजच्या दिवशी करून शिवराज्याभिषेक सोहळा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मंत्री महोदय रायगडावर दाखल झाले आहेत. संपूर्ण रायगड शिवभक्तांच्या उत्साहाने गजबजला आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच त्यानंतर शिवभक्तांना शपथ देण्यात आली.

दरम्यान राज्य शासनाच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याला गुरुवारी शिर्काईमातेच्या पूजनाने सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभरात रायगडावरील गंगासागर तलाव आणि विविध देवदेवतांचे पूजन करण्यात आले. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर ५ आणि ६ जून या कालावधीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.