सुमारे सात महिने छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ती वाघनखं (Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh ) साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात आली होती. मात्र, आता पुढील सात महिने ऐतिहासिक वाघनखं (Waghnakh) नागपूर (Nagpur) शहरातील मध्यवर्ती संग्रहालयत ठेवण्यात येणार आहे. आज (7 फेब्रुवारी) दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या खास प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाईल आणि त्यामध्ये इतर शिवकालीन शस्त्रांसह वागनखेही लोकांना पाहता येणार आहे.
हेही वाचा-BMC : महापालिकेच्या कामकाजात आता AI चा वापर
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखं लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून भरतात आणण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh) वापरलेली ऐतिहासिक वाघनखे नागपूरकरांना आजपासून (7 फेब्रुवारी) पाहता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत नागपुरात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून त्यामध्ये ऐतिहासिक वाघनखेही लोकांच्या अवलोकनासाठी ठेवली जाणार आहे.
2 फेब्रुवारी रोजी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या वाघनखांना नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात हलवण्यात आले. ब्रिटिश अधिकारी आणि पुरातत्त्व विभागाच्या विशेष पथकाच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक हस्तांतरण सोहळा पार पडला होता. वाघनखांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Devendra Fadnavis)
वाघनखांचा प्रवास ‘असा’ असेल
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी राज्यात आली आहे ती सध्या सातारा येथे होती, ही वाघनखं सातारा, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर या 4 शहरात प्रदर्शित केली जाणार असल्याचं ठरलं असून साताऱ्यातून आता नागपुरात ही वाघनखं जातील. त्यानंतर कोल्हापूर, मुंबईमध्ये वाघनखांचे जतन केले जाईल. पुरातत्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ही ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील मुक्कामानंतर 1 फेब्रुवारी ते 2 ऑक्टोबर 2025पर्यंत नागपूर येथे व त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 3 मे 2026 पर्यंत ती कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत. (Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community