महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान असलेल्या (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. याच पार्श्वभूमीवर आता लवकरच म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार इंग्लंडला जाणार आहे. एका मुलाखतीती मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.
नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
या संदर्भात अधिक माहिती देताना सुधीर मनुगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) लंडनमध्ये असलेली वाघ नखे या वर्षीच महाराष्ट्रात येणार आहे. ब्रिटन सरकारकडून या संदर्भातील पत्र मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार आहे. लंडनमधील विक्टोरिया एंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात आली आहे. सगळ्या औपचारिकता वेळेत पूर्ण झाल्यास या डिसेंबरपूर्वीच वाघनखं महाराष्ट्रात आणली जाण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Jalna Maratha Resrvation : सरकारकडून निरोप न आल्यास सलाईन काढणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे ज्या दिवशी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजल खानाचा वध केला त्यादिवशीच परत आणण्याच्या प्रयत्नात आहे. हिंदू तिथीनुसार आणण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच इतर तारखांचा देखील विचार केला जात आहे. ग्रेगोरियन कँलेंडरनुसार अफजल खानाचा वध केल्याची तारीख १० नोव्हेंबर आहे. हिंदू तिथीनुसार येणाऱ्या तारखांचा देखील विचर करण्यात येत असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community