Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यासाठीच्या मतदानाला सुरुवात

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

135

छत्तीसगड (Chhattisgarh Election 2023) आणि मिझोराममध्ये (Mizoram) आज म्हणजेच मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. एकीकडे छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात 20 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसरीकडे मिझोरामच्या सर्वच्या सर्व 40 जागांवर आजच मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये आज मतदान होत असलेल्या अनेक जागा नक्षलग्रस्त बस्तर विभागातील आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान यशस्वी करण्याची जबाबदारी 25,429 निवडणूक कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. तसेच, मतदानाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांमध्ये कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

छत्तीसगड, (Chhattisgarh Election 2023) मोहला-मानपूर, अंतागड, भानुप्रतापपूर, कांकेर, केशकल, कोंडागाव, नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंटा या 10 जागांवर सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान सुरू होईल. उर्वरित 10 जागांसाठी म्हणजेच खैरागड, डोंगरगढ, राजनांदगाव, डोंगरगाव, खुज्जी, पंडारिया, कावर्धा, बस्तर, जगदलपूर आणि चित्रकोट या जागांसाठी मतदान सकाळी 8 पासून ते संध्याकाळ 5 वाजेपर्यंत सुरु राहील.

(हेही वाचा – Israel Hamas War : इस्रायलमध्ये १ लाख भारतीयांना नोकरी मिळण्याची शक्यता)

40 लाखांहून अधिक मतदार मतदान करणार

या पहिल्या टप्प्याच्या (Chhattisgarh Election 2023) मतदानासाठी एकूण 223 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ज्यापैकी 25 महिला उमेदवार आहेत. या टप्प्यात राज्यातील 40 लाख 78 हजार 681 मतदार मतदान करणार आहेत. यापैकी 19 लाख 93 हजार 937 पुरुष आणि 20 लाख 84 हजार 675 महिला आहेत. याव्यतिरिक्त 69 ट्रान्सजेंडरही मतदान करतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.