New Chief Minister: छत्तीसगडला मिळाले नवीन मुख्यमंत्री, भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात साय यांना केंद्रात मंत्रीपदही मिळाले होते.

295
New Chief Minister: छत्तीसगडला मिळाले नवीन मुख्यमंत्री, भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय
New Chief Minister: छत्तीसगडला मिळाले नवीन मुख्यमंत्री, भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय

भाजपने छत्तीसगडला नवा मुख्यमंत्री (New Chief Minister) दिला आहे. आदिवासी समुदायातून येणारे विष्णुदेव साय हे आता छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताना दिसतील. यासंदर्भात भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रविवारी निर्णय घेण्यात आला आहे.

आदिवासी समाजाला योग्य सन्मान दिला जाईल, असे भाजपने यापूर्वीच म्हटले होते. आता मुख्यमंत्रीपदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करून, भाजपने याला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – मातृभूमीविषयी अत्युत्कट प्रेम व्यक्त करणारं ‘ने मजसी ने परत मातृभूमीला…’)

विष्णुदेव साय हे छत्तीसगडमधील कुनकुरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. राज्यात आदिवासी समुदायाची संख्या सर्वाधिक आहे आणि विष्णुदेव साय याच समुदायातून येतात. साय २०२० मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते याशिवाय ते खासदार आणि केंद्रीय मंत्रीही होते. साय यांची गणना संघाच्या काही जवळच्या नेत्यांमध्ये होते. ते रमन सिंह यांच्याही जवळचे आहेत. ते १९९९ ते २०१४ पर्यंत रायगडमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात साय यांना केंद्रात मंत्रीपदही मिळाले होते.

छत्तीसगडमधील जनतेने यावेळी कॉंग्रेसला नाकारत भाजपला सिंहासनावर बसवले आहे. येथील ९० जागांपैकी भाजपला ५४, तर कॉंग्रेसला ३५ जागा मिळाल्या आहेत. याशिवाय गोंडवाना गणतंत्र पक्षाला (JJP)एक जागा मिळाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.