छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नगरपालिका निवडणुकीत भाजपाने (BJP) विजय मिळवला आहे. राज्यातील सर्व १० महानगरपालिका निवडणुका जिंकून भाजपने काँग्रेसला मागे टाकले आहे. त्याचबरोबर नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्येही भाजपाचा भगवा फडकला आहे. रायगढ (Raigarh) महानगरपालिका निवडणुकीतही भाजपाने काँग्रेसचा पराभव करून विजय मिळवला आहे. त्यातच चहाचे दुकान चालवणारे भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार जीववर्धन चौहान येथून विजयी झाले आहेत.
जीवधरण चौहान यांनी काँग्रेसच्या उमेदवार जानकी काटजू (Janaki Katju) यांचा ३४,००० मतांनी पराभव केला आहे. जीवधरण चौहान यांनी विजयाचे श्रेय रायगढच्या लोकांना दिले आहे. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि रायगढचे आमदार आणि राज्याचे अर्थमंत्री ओपी चौधरी यांचे आभार मानले, ज्यांच्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. रायगढचे महापौर म्हणून विकासकामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. Chhattisgarh
निवडणूक जिंकल्यानंतरही जीवधरण सिंह चौहान त्यांच्या चहाच्या दुकानात चहा देताना दिसले. भाजपा (BJP) अनुसूचित जाती मोर्चाचे राज्यमंत्री जीवधरण म्हणाले की, ते पूर्वीही चहा विक्रेते होते आणि आताही चहा विक्रेते राहतील. त्यांनी सांगितले की ते त्यांच्या दुकानात राहून लोकांच्या समस्या ऐकतील आणि त्या सोडवतील. रायगढमध्ये मूलभूत सुविधांची कमतरता भासू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. (Raigarh)
जीवधरण चौहान यांच्या विजयाबद्दल ओपी चौधरी म्हणाले की, रायगढच्या लोकांचा आशीर्वाद मिळण्यावर त्यांना पूर्ण विश्वास आहे. गेल्या एका वर्षात, राज्यात विकासाचे एक नवीन राजकारण लोकांना दिसले आहे. चहाची टपरी चालवून प्रामाणिकपणे जीवन जगणारे जीववर्धन चौहान आणि भाजपा नगरसेवकांना जनतेने दिलेले आशीर्वाद मनापासून स्वीकारून भाजप लोकांच्या अपेक्षांनुसार काम करत राहील.
निवडणूक प्रचारादरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई (Vishnu Deo Sai) आणि अर्थमंत्री ओपी चौधरी यांनी जीववर्धन चौहान यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. यामुळे निवडणुकीपूर्वीच रायगढचे महापौरपदाची उमेदवारी जाहिर झाल्यावर जीवर्धन चौहान मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
रायगढच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने (BJP) ३३ प्रभागात विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने (Congress) १२ आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराने एका प्रभागात विजय मिळवला आहे. यासोबतच २ अपक्ष उमेदवारही व विजय झाले आहेत. रायगढमध्ये सुमारे ६९.६८ टक्के मतदान झाले. येथे महापौरपदासाठी ७ उमेदवार आणि प्रभाग नगरसेवक पदासाठी १४४ उमेदवार रिंगणात होते.
त्यात १५ वर्षांनंतर रायपूरमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. भाजपने महापालिकेच्या सर्व १० जागा जिंकल्या आहेत. ४९ पैकी ३६ भाजपा नगरपालिका उमेदवारांचा विजय झाला आहे. तर काँग्रेसने ७, आपने १ आणि ५ अपक्षांनी विजय मिळवला आहे. ४९ नगरपालिका आणि ११४ नगर पंचायतींसह १७३ नागरी संस्थांच्या अध्यक्ष आणि नगरसेवकांसह १० महानगरपालिकांमध्ये महापौर आणि नगरसेवकांच्या निवडणुका घेण्यात आल्या.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community