Chief Electoral Officer यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी; विधानपरिषदेच्या निवडणुकीची तयारी

प्रशासनाने मतमोजणीसाठी केलेल्या तयारीची पाहणी करून, तसेच प्रशिक्षणाची तयारी पाहून Chief Electoral Officer चोक्कलिंगम म्हणाले की, विधानपरिषदेसाठीचे ही मतमोजणी वेगळी आहे.

82
Chief Electoral Officer यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी; विधानपरिषदेच्या निवडणुकीची तयारी
Chief Electoral Officer यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी; विधानपरिषदेच्या निवडणुकीची तयारी

विधानपरिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर, तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी चे दुसरे प्रशिक्षण नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Electoral Officer) एस. चोक्कलिंगम (S Chockalingam) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या वेळी तीनही मतदार संघाच्या मतमोजणी संदर्भात प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी  चोक्कलिंगम यांनी केली.

या वेळी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. वेलरासू, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, रत्नागिरी चे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी किशोर तावडे, रायगड चे किशन जावळे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त अमोल यादव उपस्थित होते.

(हेही वाचा – Virat Kohli: विश्वचषकातील विराट कोहलीच्या ‘या’ दोन कामगिरीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ज्यामुळे तो ठरला सर्वोत्तम खेळाडू)

यावेळी नगर परिषद संचालनालयाचे संचालक मनोज रानडे, उपायुक्त विवेक गायकवाड यांनी मतमोजणी साठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्यक्ष मतमोजणीची माहिती दिली.

मतपत्रिका वैध-अवैध ठरविताना काळजी घ्या

प्रशासनाने मतमोजणी साठी केलेल्या तयारीची पाहणी करून, तसेच प्रशिक्षणाची तयारी पाहून चोक्कलिंगम म्हणाले की, विधानपरिषदेसाठीचे ही मतमोजणी वेगळी आहे. त्यामुळे परिपूर्ण कारण असल्याशिवाय मतपत्रिका अवैध ठरवू नका. तसेच मतपत्रिका वैध-अवैध ठरविताना काळजी घ्यावी. मतमोजणी प्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक नियमावलीचे अवलोकन करावे.

मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेशासाठी अधिकृत पत्रकारांना प्राधिकार पत्रांचे वाटप करण्यात आले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी प्रधिकार पत्र अनिवार्य आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप सारख्या वस्तू नेणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. याची सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी नोंद घ्यावी. कृपया मतमोजणी कक्षात अशा वस्तू सोबत आणू नये आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.