राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील गुरुवारची सुनावणी नियोजित वेळेच्या तासाभर आधीच संपली. सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी यांनीही ठाकरे गटासाठी युक्तिवाद केला. यावेळी सिंघवींच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांनी एक महत्त्वाची टिप्पणी केली.
नेमके काय झाले?
युक्तिवाद करताना अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, ‘राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली असून हे एक ऐतिहासिक आणि खेदजनक म्हणावे लागले. निवडणूक आयोगाच्या निकालामध्येही शिवसेनेच्या फुटीचा उल्लेख केलेला आहे. दरम्यान राज्यपालांच्या अधिकारांबाबत दहाव्या सुचीचा विचार व्हायला पाहिजे. राज्यपालांचा सभागृहात घडणाऱ्या घटनांशी संबंध नसतो.’ त्यानंतर राज्यपालांचेही राजकीय लागेबांधे असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
जर राजीनामा दिला नसता तर…
या युक्तिवादावर सरन्यायाधीशांनी महत्त्वाची टिप्पणी केली. ते म्हणाले की, ‘बहुमत चाचणीसाठी तुम्ही सामोरे गेला नाहीत. जर तुम्ही बहुमत चाचणीसाठी सामोर गेले असता तर ३९ आमदारांच्या मतांनी हरला असता. आणि यामुळे आम्ही ती बहुमत चाचणी रद्द केली असती. मात्र त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे तो अधिकार तुम्ही गमावला आहे.’
(हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील ‘सर्वोच्च’ सुनावणी संपली; पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला)
Join Our WhatsApp Community