मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची औरंगजेबच्या कबरी संदर्भात स्पष्ट भूमिका; म्हणाले, उदात्तीकरण चालणार नाही 

56
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची औरंगजेबच्या कबरी संदर्भात स्पष्ट भूमिका; म्हणाले, उदात्तीकरण चालणार नाही 
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची औरंगजेबच्या कबरी संदर्भात स्पष्ट भूमिका; म्हणाले, उदात्तीकरण चालणार नाही 

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात मोगल बादशहा औरंगजेबाच्या कबरीचे (Aurangzeb’s Tomb) उदात्तीकरण चालणार नसल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केली. ASI ने 50 वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारलाही तिला संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. पण महाराष्ट्रात औरंगबेजाबाच्या कबरीचे केव्हाही उदात्तीकरण होणार नाही. येथे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) उदात्तीकरण होईल. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने (तिथीनुसार) भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाडा येथील शिवरायांच्या पहिल्या मंदिराचे (Shivaji’s first temple) लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीसांनी या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा केली. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांची शिवजयंतीनिमित्त खास पोस्ट; म्हणाले, झटपट यशासाठी… )

औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवरायांचे मंदिर व औरंगजेबाच्या कबरीवरील आपली भूमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात केवळ शिवरायांचेच महिमामंडन होईल. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही. औरंगजेबाच्या कबरीला ASI ने 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. पण या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे केव्हाच महिमामंडन होणार नाही.

शिवाजी महाराजांचे मंदिर (Shivaji Maharaj Temple) कशासाठी? ते यासाठी की आज आपण आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन साधना करू शकतो याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी देव, देश, धर्माची लढाई जिंकली म्हणून तुम्ही-आम्ही हिंदू आहोत. जसे हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचे दर्शन पूर्ण होत नाही. तसे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन आपल्याला फळणार नाही.

(हेही वाचा – Jalyukt Shivar योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘या’ फाऊंडेशन सोबत करार झाल्याची राज्य सरकारची घोषणा)

शिवरायांचे मंदिर खऱ्या अर्थाने राष्ट्रमंदिर
हे फक्त मंदिर नाही. या मंदिराला सुंदर तटबंदी आहे. बुरूजं आहेत. दर्शनीय असा प्रवेशमार्ग आहे. सुंदर बगिचा आहे. शिवरायांच्या जीवनातले सर्व प्रसंग आपल्याला इथे पाहावयास मिळतात. अतिशय सुंदर अशा शिल्पांमध्ये शिवरायांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत तथा छत्रपती संभाजी महाराजांनी (Chhatrapati Sambhaji Maharaj) वाघाचा जबडा फाडला त्या प्रसंगापर्यंतचे सर्व प्रसंग आपल्याला या मंदिरात पाहायला मिळतात, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.