Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांसह अजित पवार, देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा – उद्धव ठाकरे

120
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या सरकारच्या काळात आरक्षण टीकले नाही, तेव्हा बाकीचे विकेट किपर होते तेव्हा काही का केले नाही, अजित पावरही आमच्या सरकारमध्ये होते. माझे काय चुकत होते तेव्हा त्यांनी सांगायला हवे होते. आम्ही कुठेही वकील बदललेले नव्हते. आता महत्वाचे म्हणजे त्यावेळचे अपयश मला देत असाल तर आता तुम्ही डोकी फोडली आहेत, त्याची जबाबदारी सगळ्यांनी टीम वर्क म्हणून स्वीकारली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले. आतापर्यंत मी गृहमंत्र्यांचा राजीमाना मागत होतो, आता टीम वर्क म्हणून या तिघांनीही राजीनामा दिला पाहिजे. हा दोष त्यांच्या टीमचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एकुणच हे तीन तिघाडी सरकार आहे, ट्रीपल इंजिन न्याय, हक्कासाठी रस्त्यावर यायच नाही, नाहीतर आम्ही मारहाण करु, असेच या सरकारच सुरू आहे. बारसुमध्ये असेच झाले होते. जबाबदारी कोण घेणार? आदेश कुणी दिला? डोळ्या देखत जर पोलीस न जुमानत वागत असतील तर त्यांचा प्रशासनावर कंट्रोल नाही असा याचा अर्थ होतो, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, असेही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले, त्यावेळचे आरोप माझ्यावर करत असाल तर तुम्ही आता जबाबदारी घेऊन राजीनामे द्यायला हवेत. देवेंद्र फडणवीस यांच ज्ञान एवढ तोकडे असेल असे वाटले नव्हते. वटहुकूम याबाबत काढण्याचा अधिकार संसदेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दिल्लीतील निर्णय केंद्राने फिरवला, तसा हा निर्णय केंद्राचा आहे. हा अधिकार केंद्राचा आहे. जर वटहुकूम राज्य सरकार काढायला लागली, याचा अर्थ त्यांचा अभ्यास कमी असेल, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.