अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री Eknath Shinde संतापले; म्हणाले, थोबाड… 

165
अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री Eknath Shinde संतापले; म्हणाले, थोबाड... 
अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री Eknath Shinde संतापले; म्हणाले, थोबाड... 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उबाठा पक्षाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. सावंत यांच्या विरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात (Nagpada Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. (Eknath Shinde)

उबाठा पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी शिवसेना पक्षाच्या मुंबादेवी मतदारसंघाच्या (Mumbadevi Constituency) उमेदवार शायना एन.सी. यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर संताप व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, “जर बाळासाहेब असते आणि कोणत्याही शिवसैनिकाने हे केले असते तर त्यांनी थोबाड फोडले असते.”  तसेच लाडक्या बहिणींबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नसल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शायना एनसी (Shayna NC) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या त्यांनी यावेळी निषेध केला.

नेमकं काय आहे प्रकरण?

अरविंद सावंत यांनी शायना एन.सी. यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‘त्यांची अवस्था बघा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि दुसऱ्या पक्षात चालल्या गेल्या. “इंपोर्टेड माल इथे काम करत नाही. इथे फक्त ओरिजनल माल काम करतो” असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. 

(हेही वाचा – Assembly Election मध्ये उमेदवाराचे नाव ‘सेम टू सेम’; नशीब आजमावण्याच्या नादात कुणाचा होणार ‘गेम’)

निवडणूक आयुक्तांना पत्र

दुसरीकडे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Shiv Sena leader Neelam Gorhe) यांच्याकडून या वक्तव्याप्रकरणात अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्याविरोधात निवडणूक आयोगाला एक पत्र देखील पाठवण्यात आलं आहे. महिलांविरोधात वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी निलम गोऱ्हे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.