मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कांद्याला प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देणार

141

मागच्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या विरोधात राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत. तर शेतक-यांनीही अनेक ठिकाणी आंदोलने केली आहेत. यानंतर आता राज्य सरकारने कांद्याला 300 रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणाही केली आहे.

( हेही वाचा: आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप; सांगितला CM शब्दाचा चा नवा अर्थ )

काय म्हणाले मुख्यमंत्री

यासंदर्भात बोलताना, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशंवत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतक-यांच्यादृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.