शेतकरी कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांची दिवाळी; म्हणाले, “धीर सोडू नका…”

148

राज्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतातील पिकांची पावसामुळे नासाडी झाल्याने ते कुजून गेलेत. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात नाही झाली. या परिस्थितीवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच पेटलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची दिवाळी शेतकरी कुटुंबियांसह साजरी केली आहे. यावेळी नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, राज्य शासन तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांना दिले.

(हेही वाचा – Diwali 2022: सराफा बाजाराला झळाळी, तब्बल 25 हजार कोटींची उलाढाल)

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही दिवाळी साजरी करण्यात आली आहे. राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबियांसोबत एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी साजरी केली. राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरुपात शेतकरी बांधव सपत्निक या अनोख्या सोहळ्याला उपस्थित होते. राज्यभरातून आलेल्या शेतकाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत फराळाचा आस्वाद घेतला. आलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे यावेळी औक्षण करण्यात आले.

यावेळी एकनाथ शिंदेंची पत्नी लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत यांनी प्रत्येक शेतकरी कुटुंबांचे औक्षण केले. त्यांना साडी- चोळी, धोतर आणि भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी कृती विकास आराखडा तयार करीत असल्याचे सांगतानाच नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. राज्य शासन तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.