उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या सरकारमधील समावेशामुळे राज्यातील सत्तेची समीकरणेही बदलली आहेत. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या एकाही आमदाराचा पराभव होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
बावनकुळेंच्या दाव्याने साशंकता
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत १५२ हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या दाव्यामुळे भाजपच्या शिवसेना व राष्ट्रवादी या मित्रपक्षांना किती जागा मिळणार? याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेतील बंडावेळी आपल्यासोबत आलेल्या ५० पैकी एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नसल्याचा दावा केला आहे.
(हेही वाचा – राजधानीत यमुनेच्या पुराचे थैमान; लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर)
निर्धार काल आणि आजही कायम
सत्ताधारी पक्ष विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढवणार आहेत. मी माझ्या पहिल्याच भाषणात हे ५० आमदार २०० आमदारांचा टप्पा ओलांडणार असल्याचे सांगितले होते. तसेच माझ्यासोबत असणाऱ्या एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नसल्याचा निर्धारही व्यक्त केला होता. त्याचा पुनरुच्चार मी आताही करतोय. मी माझ्या एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community