काँग्रेस नेते राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. आता उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसला जवळ केले. बाळासाहेब आज असते तर त्यांनी यांना जोड्याने मारले असते, अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी पालघरच्या मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे प्रचारसभा झाली. या मतदारसंघात ठिकाणी महायुतीचे भाजप उमेदवार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांचा मुकाबला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कामडी यांच्याशी होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, पालघर हा आपला बालेकिल्ला आहे. हा दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. तो आपल्याकडेच राहील. विरोधक गत अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांचे लाँचिंग करत आहेत. पण त्यांचे लाँचिंग होत नाही. आता राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आहेत. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसला जवळ केले. आज बाळासाहेब असते तर त्यांनी यांना जोड्याने हाणले असते, असे शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.
(हेही वाचा Rain in Mumbai : मुंबईत पावसाचा पॉवर प्ले; विमानतळाचा रन-वे बंद, मेट्रो ठप्प)
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार हे निश्चित, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. विरोधक मला रोज शिव्याशाप देतात. त्यांना शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याचे बघवत नाही का? मला नाही तर दुसऱ्या एखाद्याला मुख्यमंत्री करायचे होते. पण ते स्वतःच उडी मारून बसले, असेही एकनाथ शिंदे यावेळी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हणाले.
Join Our WhatsApp Community