शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण दोन्ही एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिले आहे. हा उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. एका बाजूला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणारा निर्णय समोर आला आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने दिले असून यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.
( हेही वाचा : धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाचे; केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय )
हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय
सर्व प्रथम निवडणूक आयोगाचे धन्यवाद मानतो. हा लोकशाहीचा विजय आहे. हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय असून लोकशाहीत बहुमताला महत्त्व दिले गेल्याने आज सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
Join Our WhatsApp Community