आमच्याकडे सगळ्यांचा चिठ्ठा आहे, पण आम्हाला कामाने उत्तर द्यायचे आहे. परंतु, प्रत्येक गोष्टीला काही सीमा, सहनशक्तीला मर्यादा असते, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिला.
विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी वाढली आहे. रात्री ३.३० पर्यंत मी काम करतो, पुन्हा सकाळी ७.३० पासून कामकाज सुरू होते. पण, विरोधक चांगल्याला चांगले म्हणत नाहीत. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले, तर राज्याच्या विकासाची गती आणखी वेगवान होईल.
स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवणार
पाऊस आणि इतर हवामान विषयक बाबींचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक २,४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील.
Join Our WhatsApp Community