मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे येथील BKC मैदानावर होत आहे. BKC मैदानावर तुफान गर्दी झाली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात विश्वविक्रम झाला आहे.
12 फुटी चांदीची तलवार देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्या निमित्ताने 12 फुटांची चांदीची तलवार भेट म्हणून दिली आहे. या तलवारीने विश्वविक्रम केला आहे. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वात मोठी तलवार आहे. चांदीचा धनुष्यबाण, चांदीची गदादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट म्हणून देण्यात आली आहे.
( हेही वाचा: शिवसेना आम्ही नव्हे, तुम्ही संपवली; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात )
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 51 फुटी भव्य अशा तलवारीचे पूजन करण्यात आले. रामदास कदम, शंभुराज देसाई व इतर नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. मंत्रोच्चारात शस्त्रपूजा झाली. यानंतर तुळजापूरहून आलेल्या ज्योतीचे मुख्यमंत्र्यांनीही दर्शन घेतले.
Join Our WhatsApp Community