स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचेच औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री बारा वाजता ठाण्याच्या शिवसेना शाखेत ध्वजारोहण करण्याची चाळीस वर्षांपूर्वीची परंपरा कायम ठेवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री 12 वाजता ठाण्याच्या शिवसेना शाखेत ध्वजारोहण केले. यावेळी शेकडो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना, त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरु केली होती. तिच परंपरा आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावरदेखील कायम ठेवली आहे. या कार्यक्रमावेळी शिंदे गट विरुद्ध उद्धव गट असा सामनादेखील रंगणार होता. कारण उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आमने- सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
( हेही वाचा: Google ने भारताच्या स्वातंत्र्यमहोत्सवासाठी बनवले अनोखे Doodle )
राजन विचारेंचीही उपस्थिती
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी खातेवाटपावर भाष्य केले. ते म्हणाले की, ज्या विभागाची जबाबदारी, ज्या मंत्र्यांवर दिलेली आहे. ती यशस्वीरपणे पार पाडतील, आता ते राज्याचे मंत्री आहेत. तसेच ध्वजारोहणासाठी उद्धव गटात असेलेले राजन विचारेही तिथे उपस्थित होते. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या. ज्यांना या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहायचे आहे, त्यांना येऊ द्या, असे सांगितले होते.
Join Our WhatsApp Community