मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी विरोधकांना लगावला टोला ; म्हणाले, मुख्यमंत्री ऐवजी…

229
अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री Eknath Shinde संतापले; म्हणाले, थोबाड... 
अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री Eknath Shinde संतापले; म्हणाले, थोबाड... 

विधानसभा निवडणूकीचा (Vidhan Sabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. अशातच महाविकास आघाडीसह (Mahavikas Aaghadi) महायुतीत जागावाटपाचा पेच कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, येत्या विधानसभेत मुख्यमंत्री ठरवण्याऐवजी, विरोधी पक्षनेता पदाचा उमेदवार ठरवा. नाही तरी, आघाडीतील नेत्यांच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात अडकणार आहेत.  असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला. मुख्यमंत्री शिंदे आपल्या दरे या गावी अचानक आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.  (Eknath Shinde)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. आम्ही एकत्रित निवडणूकीला सामोरे जाणार आहोत. गेल्या दोन सव्वा दोन वर्षात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे झाली आहेत. याची पोच पावती जनता मतपेटीतून दिल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान राज्यात कुठेही बंडखोरी होणार नाही महायुती समन्वयाने लढेल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.

(हेही वाचा – Bihar मध्ये विषारी दारुमुळे ४१ जणांचा मृत्यू)

ते पुढे म्हणाले, विधानसभेच्या निवडणूकांमध्ये महायुतीने केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही. कारण जेवढे काम केले, जेवढे प्रकल्प पुढे नेले, जेवढ्या कल्याणकारी योजना राबवल्या. कोण उभे राहते हे महत्त्वाचे नाही तर शेवटी जिंकणं महत्त्वाचं आहे, कोणाला किती जागा द्यायच्या व कुठे कोणते उमेदवार द्यायचे हे शुक्रवार १८ ऑक्टोबरपासून पुढील दोन दिवसात ठरेल. यासंदर्भात महायुतीमध्ये (Mahayuti) कोणताही वाद नाही. असे विधान एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच महायुतीत कोणतीही स्पर्धा नाही आणि मी तर स्वत:ला मुख्यमंत्री न मानता सर्वांना उपलब्ध असलेला कॉमन मॅन समजतो असे मत शिंदेंनी व्यक्त केले. (Eknath Shinde)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.