एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अखेर तोडगा! मुख्यमंत्र्यांनी पगाराबाबत केली मोठी घोषणा

179

एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून पगार वेळेत होत नसल्याने आणि इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला होता. एसटी कर्मचाऱ्यांकडून आत्मक्लेष आंदोलन सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांसोबत राज्य शासनाकडून चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. यावेळी कर्मचाऱ्यांकडून अनेक मागण्या करण्यात आल्या.

( हेही वाचा : आरोग्य मंत्र्यांचा फोन; …अन २४ तासांत सुरू झाला हिरकणी कक्ष)

दर महिन्याला ५ तारखेपर्यंत एसटी महामंडळाला पगारासाठी आवश्यक निधी देणार

अखेप या सर्व प्रश्नांवर तोडगा निघाला आहे. दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत राज्य सरकार एसटी महामंडळाला पगारासाठी आवश्यक निधी देणार आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे पगार ७ तारखेला होतील अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे. मंगळवारी दुपारी विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळावा, यासोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेळी १६ मागण्यासंदर्भात जी सहमती झाली होती त्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.