तेव्हा फडणवीसांनी धनंजय मुंडे यांच्यावर ‘करुणा’ दाखवली; एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी

156

धनंजय मुंडे परवा सभागृहाबाहेर बेंबीच्या देठापासून घोषणा देत होते. एवढ्या जोरात की, अनेक वर्षांपासून ते शिवसैनिक आहेत, अशी शंका यावी. त्यांचा सगळा प्रवास आम्हाला माहिती आहे. एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर प्रेम, दया ‘करुणा’ दाखवली होती, पण पुनःपुन्हा दाखवता येणार नाही, अशी जोरदार टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली.

( हेही वाचा : … तेव्हा वैभव चेंबरमधून फाईल्स हाताळल्या जायच्या; नितेश राणे यांचा गौप्यस्फोट )

‘मितभाषी’ अशी ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांची सभागृहातील शाब्दिक फटकेबाजी ऐकून सारेच अवाक झाले. नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयकावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. शिंदे म्हणाले, छगन भुजबळ यांनी मला एकदा विचारले होते, ‘काय बाबा कसं चाललंय ठीक आहे ना, ओके आहे ना?’ त्यावर मी त्यांना ‘सगळं एकदम ओक्के आहे’, असे सांगितले होते. त्यामुळे भुजबळ आणि अजित पवार यांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या, असेही शिंदे यांनी सांगितले.

रिमोट कंट्रोल कुणाकडे, हे सर्वांना कळलंय

महाविकास आघाडीतील कारभारावर भाष्य करताना शिंदे म्हणाले, कुणी कुणाच्या खांद्यावरून बंदूक चालवली, कोणाकडे रिमोट कंट्रोल होता, हे अजित दादांना सगळे माहिती आहे. ते (उद्धव ठाकरे) तुमचे ऐकत होते, म्हणून आमचे ऐकत नव्हते, अशी टीकाही शिंदे यांनी केली.

पारदर्शकता येईल

नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडल्यास धनशक्ती, गुंड प्रवृत्ती बळावेल, असे विरोधी पक्षाचे सदस्य म्हणत आहेत. पण पैसेवाला किंवा गुंड एखाद्या विभागावर प्रभाव पाडू शकेल, संपूर्ण शहरावर असा प्रभाव पडणे शक्य नाही. नगराध्यक्षाला अधिकार देण्याबाबत तुमच्या सूचनांचा विचार आम्ही करू. मात्र, कारभारात पारदर्शकता आणायची असेल, तर लोकांमधून नगराध्यक्ष निवडून आणणेच योग्य होईल, असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.