देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज म्हणजेच मंगळवार १ ऑगस्ट रोजी पुण्यात ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदी यांच्या कामाचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जगभरातले लोक एक महत्त्वाचा नेता म्हणून पाहतात ही अभिमानाची गोष्ट आहे, असं मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
(हेही वाचा – PM Narendra Modi : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पंतप्रधानांचीच निवड का? दीपक टिळक म्हणाले…)
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यासाठी नरेंद्र मोदी यांना निवडले, त्याबद्दल टिळक स्मारक समितीचे मी आभार मानतो. नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कामाचे लोकांनी कौतुक केले आहे. टिळकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. पण, स्वातंत्र्याचे सुराज्य किती झाले, हे आपल्याला माहिती आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत सुराज्य निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांत मोदी यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणजे टिळक पुरस्कार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
लोकमान्य टिळक पुरस्कार २०२३ | पुणे https://t.co/VIGbIlX0sc
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 1, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, हा पुरस्कार यापूर्वी अनेकांना दिला गेला आहे. ज्यांनी समाजामध्ये चांगलं काम केलं त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. आता जगप्रसिद्ध असलेल्या मोदींना हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो.
‘सबका साथ आणि सबका विकास’चा नारा
मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की; “मोदींनी देशाचं सूत्र हाती घेतलं आणि ‘सबका साथ आणि सबका विकास’चा नारा दिला आहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. जगात मोदींचं नाव आदरानं घेतलं जातं. कोणी ऑटोग्राफ घेतात, फोटो काढतात आणि जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांना ग्लोबली पॉवरफुल्ल म्हणतात, तेव्हा अभिमानाने छाती फुलते.
अनेकांना आत्मनिर्भर होण्यास मदत
भारताला आत्मनिर्भर करण्याचा नारा देत अनेकांना आत्मनिर्भर होण्यास मदत केली. ‘आपण योग्य रस्ता मिळण्याची वाट बघण्यात दिवस घालवतो. मात्र आपल्याला याचा विसर पडतो की, रस्ते हे वाट बघण्यासाठी नाही तर चालण्यासाठी असतात’, असं लोकमान्य टिळक म्हणाले होते. त्यामुळे मोदींनी हाच उपदेश आत्मसात केला आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम ते करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community