दसरा मेळाव्याचा नवा टीझर जारी करत मुख्यमंत्र्यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा, म्हणाले…

129

आज, बुधवारी मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहे. बीकेसीमध्ये शिंदे गटाचा तर शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. या दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान, दसरा मेळाव्याच्या काही तासांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्वीट करत दसरा मेळाव्याचा आपला नवा टीझर जारी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडली, त्यामुळे यंदा दोन दसरा मेळावे होणार आहेत. मेळाव्याआधी दोन्ही गटात चांगलेच ट्विटर वॉर रंगले आहे. दसरा मेळाव्याआधी मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

(हेही वाचा – राज ठाकरे यांचे दोन्ही शिवसेना दसरा मेळाव्याकडे लक्ष : एकाची सभा पाहणार तर दुसऱ्याची ऐकणार)

तर या आधीही शिंदे गटाने दसरा मेळाव्याने काही टीझर जारी केले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा नवा टीझर जारी केला आहे. यावेळी त्यांनी असे म्हटले की, नावाचा नाही तर विचारांचा वारसा दसरा मेळावा. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आरसा… तर याआधी त्यांनी असेही म्हटले की, निर्णय विकासाचा, निर्णय हिंदुत्वाचा, निर्णय मराठी अभिमानाचा दसरा मेळावा स्वाभिमानाचा… नवी आशा, नवी पहाट, जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार, भेदभाव सोनं लुटुया हिंदुत्वाच्या विचारांचं…. करुनी सीमोल्लंघन साधूयात लक्ष महाराष्ट्राच्या विकासाचं….विजयादशमीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देत करत मुख्यमंत्र्यांनी हे सूचक ट्वीट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? कोणावर टीकास्त्र सोडणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अशा दिल्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक टीझर जारी करताना आपल्या व्हिडिओला कॅप्शन देखील दिले आहे. ही वेळ आहे अनेक नव्या संकल्पांसह सीमोल्लंघनाची, हिंदूत्व आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, राज्यातील माय-बाप जनतेच्या सुख समृद्धी आणि भरभराटीसाठी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आपण सगळे जमणार आहोत बीकेसी मैदानावर…सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.