काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान केल्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर सर्वत्र टीका केली जात आहे. भाजप आणि शिवसेनेने राहुल गांधींना विरोध केला असून त्यांच्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, वीर सावकरांचे नातू रणजित सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. उद्धव ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतरही कॉंग्रेस आपल्या मतावर ठाम आहे. त्यामुळे पक्षीय किंवा राजकीय फायद्यासाठी सावरकरांचा वापर करू नका, जे त्यांच्यासाठी लढायला पुढे येतील तेच खरे सावरकरवादी, तसेच कॉंग्रेसच्या शिदोरी मासिकावर कारवाई करावी अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करणार असल्याची माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
( हेही वाचा : …तर उद्धव ठाकरे आणि पवारांनी राहुल गांधींना माफी मागण्यास भाग पाडावे! रणजित सावरकरांची मागणी)
शिदोरी मासिकावर कारवाई करावी – रणजित सावरकर
संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या वीर सावरकर गौरव यात्रेला ढोंग म्हटले आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय, असा प्रश्न रणजित सावरकरांना केला असता ते म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या शिदोरी मासिकावर त्यांनी कारवाई केली नाही, त्याच शिदोरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कारवाई करावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली तर कोण खरं आणि कोण ढोंगी हे लगेच सिद्ध होईल असे रणजित सावरकरांनी स्पष्ट केले.
माफी मागितल्याचे पुरावे दाखवा, रणजित सावरकरांचे आव्हान
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींवर कारवाई होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आज राहुल गांधी गप्प बसले म्हणून उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांनी राहुल गांधींना माफ न करता त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, राहुल गांधींना माफी मागण्यास भाग पाडलं पाहिजे, तेव्हाच ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेला अर्थ प्राप्त होईल. तसेच सावरकरांनी माफी मागितली याचे पुरावे दाखवा असे आव्हान सुद्धा रणजित सावरकरांनी राहुल गांधींना दिले आहे.
Join Our WhatsApp Community