मेळाव्याच्या आधी एकनाथ शिंदेंचे सूचक ट्विट

92
उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांचे दोन मेळावे काही तासांतच होणार आहेत, त्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यामुळे त्यांचे हे ट्विट चर्चेत आले आहे.

काय केले आहे ट्विट? 

मुंबईतील शिवतीर्थ आणि बीकेसी मैदानात सकाळपासून राज्यभरातून शिवसैनिक येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपापले मेळावे तुफान गर्दीचे करण्यासाठी कंबर कसली असून, जास्त गर्दी कोणाच्या मेळाव्यात होणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार आहे. शक्तिप्रदर्शनाची ही कांटे की टक्कर कोण जिंकणार, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे, त्यात एकनाथ शिंदे म्हणाले, मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे. भारतीय कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांच्या दोन ओळी लिहिल्या आहेत. तसेच विचारांचे वारसदार असेही म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.