मुख्यमंत्री गेले थेट शेतात, मशागत करून स्ट्रॉबेरीची केली लागवड

121

रात्री उशिरापर्यंत काम करणारे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचा गाडा हाकण्याच्या कामातून दोन दिवस उसंत घेतली, ते दोन दिवस मुख्यमंत्री शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी मुक्कामी गेले, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत:च्या शेताची पाहणी केली. शेतीची मशागत केली आणि तिथे स्ट्रॉबेरी पिकाची लागवडही केली. गावचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्याने गावकऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचे उत्साहात स्वागत केले.

गावात पर्यटनवाढीसाठी बैठक 

शेतातील कामे आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक बग्गीमधून गावात फेरफटका मारत गावकऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच त्यांच्या शेतात असलेल्या गवती चहाच्या पिकासह आंब्याच्या बागेची पाहणी केली. मुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी सकाळी दरे या गावात पोहोचल्यानंतर त्यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेऊन पर्यटनाच्या वाढीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील, याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सातारा जिल्ह्यातील पुनर्वसनाचा प्रश्न अनेक नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. या संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामदैवत असलेल्या उतेश्वर देवाचे दर्शन प्रचंड पावसामुळे झाले नव्हते, मात्र आता या भागात पाऊस थांबल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ग्रामदैवताचे दर्शनही घेतले.

(हेही वाचा boycott adipurush : ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा निर्माता घाबरला, प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.