राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या (Virtual Classroom) १५ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ७५ व्हर्चुअल क्लासरुमचे उद्घाटन (Virtual Classroom) करणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहात दुपारी बारा वाजता हे उद्घाटन करण्यात येणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी ९१२ ऑगस्ट) ही माहिती दिली.
(हेही वाचा – Free Medical Treatment : १५ ऑगस्टपासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत मिळणार मोफत उपचार)
मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “व्हर्चुअल क्लासरूममध्ये (Virtual Classroom) इंटरॲक्टीव्ह पॅनल,संगणक सेवा,उत्तम बैठक व्यवस्था असणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्कील इंडिया’ व ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमातंर्गत राज्यातील ४१९ या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यात कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाद्वारे ४१९ शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे बळकटीकरण व ५४७ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करून राज्यात युवक व युवतींना रोजगाराभिमुख (Virtual Classroom) कौशल्य विकास करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास (Virtual Classroom) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,रोजगार व नाविन्यता विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी हे उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती मंत्री लोढा यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community