महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षांनी मिळून एकत्रित सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सभांना २ एप्रिलपासून छत्रपती संभाजीनगरमधून सुरूवात होणार आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या या सभांना उत्तर देण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनुष्यबाण यात्रा काढणार आहेत.
( हेही वाचा : विरोधीपक्षनेते अंबादास दानवे शिवसेनेच्या संपर्कात; संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट )
छत्रपती संभाजीनगरमधून धनुष्यबाण यात्रेला सुरूवात होणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये २ एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनुष्यबाण यात्रा काढणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या धनुष्यबाण यात्रेची सुरूवात छत्रपती संभाजीनगर शहरातून होणार आहे. ८ किंवा ९ एप्रिलला धनुष्यबाण यात्रेला सुरूवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण’
पक्ष आणि चिन्ह यांच्या वादात शिंदे गटाची सरशी झाली. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेला धनुष्यबाण त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणार आहे. ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण’ असे या यात्रेचे घोषवाक्य असणार आहे.
Join Our WhatsApp Community