मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या कामाचा वेग वाढवला आहे. विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री यांचे दौरे सुरु असतात. अशाच एका पूर्वनियोजित दौऱ्यावर मुख्यमंत्री शिंदे जाणार होते. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना इमर्जन्सी लँडिंग करावी लागली.
(हेही वाचा – Karnataka Election Results 2023 : कर्नाटक निवडणुकांवर संजय राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…)
मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आपल्या पूर्वनियोजित सातारा दौऱ्यावर निघत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. त्यानंतर राजभवन येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.
हेही पहा –
माहितीनुसार, मुंबईतील राजभवन येथून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सातारा येथे कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले, मात्र बिघाड झाल्याचे लक्षात येताच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. यानंतर त्यांचा सातारा-पाटण दौरा रद्द करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community