धर्मवीर आणि हिंदवी स्वराज्याचे महान रक्षक छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ (Chhava) हा हिंदी चित्रपट सध्या बॅाक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहून प्रेक्षक भावूक झाले आहेत. पाणावलेल्या डोळ्यांनी अनेकजण थिएटरमधून बाहेर येताना दिसत आहेत. यादरम्यान राज्यात हा चित्रपट करमुक्त केला जावा अशी मागणी केली जात आहे. (Chhava)
हेही वाचा-भारत की इंडिया ? Delhi High Court ने केंद्र सरकारला वेळ वाढवून दिला
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या मागणीबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. “मला एका गोष्टीचा आनंद आहे की, छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, विरता आणि विद्वत्ता प्रचंड होती, पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. ज्यांच्याबद्दल ‘देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा (Chhava) था। महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था’, असं म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला, इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक असा सिनेमा तयार झाला आहे. त्याबद्दल सिनेमाचे निर्माते, निर्देशक आणि प्रमुख भूमिका करणारे विकी कौशल (Vicky Kaushal) यांचे मानापासून अभिनंदन करतो.” (Chhava)
हेही वाचा-‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची Hindu Janajagruti Samiti ची सरकारकडे मागणी !
“मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की, हा सिनेमा (Chhava) टॅक्स फ्री करा. पण मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा जो करमणूक कर असतो तो माफ केला जातो. महाराष्टाने २०१७ सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात करमणूक कर हा नेहमीकरिता रद्द केला आहे. आपल्याकडे (महाराष्ट्रात) करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही.” अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. (Chhava)
🕚 10.53am | 19-2-2025 📍 Pune.
LIVE | Media interaction #Maharashtra #Pune https://t.co/Q6hyszWAgR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2025
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणार्या अभिनेत्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू, अशा प्रकारे कोणी वागत असेल तर सरकारही माफ करणार नाही आणि शिवप्रेमीही माफ करणार नाहीत.” (Chhava)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community