मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणतात, आसाममध्ये ४० टक्के Muslim लोकसंख्या

131

आसामच्या डेमोग्राफीत अथवा लोकसख्येत झालेला बदल हा माझ्यासाठी एक मोठा मुद्दा आहे. आज आसाममधील मुस्लीम (Muslim) लोकसंख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. 1951 मध्ये ही लोकसंख्या 12 टक्के होती. या कालावधीत आपण अनेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही, तर जीवन-मरणाचा प्रश्न आहे, असे स्पष्ट मत भाजपाचे नेते, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मांडले.

(हेही वाचा Ashadhi Wari शांत, समावेशक परंतु रामनवमी, हनुमान जयंती शोभायात्रा हिंसक; इरफान इंजिनियर यांच्याकडून हिंदू धर्माचा अवमान)

कोणताही गुन्हा कुण्या एखाद्या विशिष्ट धर्माकडून गेला जातो, असे मी म्हणत नाही. मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या घटना चिंतेचा विषय आहे. यापूर्वी 23 जून रोजी हिमंता बिस्वा सरमा यांनी दावा केला होता की, बांगलादेशी अल्पसंख्याक (Muslim)  समुदायाच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले होते. केंद्र आणि राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विकासकामांकडे दुर्लक्ष करून त्यांनी मतदान केले. बांगलादेशी वंशाचे अल्पसंख्याक (Muslim) हा एकमेव समुदाय असा आहे, जो राज्यात जातीयवादात गुंतला आहे, असा दावाही सरमा यांनी केला होता. आसाममध्ये लोकसभा निवडणुकीत 24 पैकी 15 जागा भाजपाने जिंकल्या आहेत, तर 3 जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.