मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “यापुढे असेच सहकार्य राहु द्या”, असे सूचक वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय? मुख्यमंत्री कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत यावर आता चर्चा सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री काय निर्णय घेणार
संजय राऊत यांनी थोड्या वेळापूर्वीच सरकार बरखास्त होण्याच्या वाटेवर असल्याचे ट्वीट केले होते. त्यांच्या या ट्वीटनंतर सरकार पडण्याचे संकेत मिळाले होते. आता यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापुढे असेच सहकार्य राहु द्या; असे वक्तव्य मंत्रिमंडळ बैठकीत केले आहे. त्यामुळे या विधानानंतर, मुख्यमंत्री आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( हेही वाचा: आदित्य ठाकरे मंत्रिपद सोडणार? सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये केला बदल )
मविआवर टांगती तलवार
शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर, राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यात बैठका घेतल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर, महाविकास आघाडी सरकारवर आता टांगती तलवार लटकत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानानंतर मात्र आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
Join Our WhatsApp Community