शाळा पुन्हा सुरु, पण…! आदित्य ठाकरे काय म्हणाले?

सोमवार, २४ जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नाही. याची नोंद पालकांनी घेतली पाहिजे. पालकांच्या आग्रहाखातर शाळा सुरू करण्यात आल्या आहे. रिस्क घेऊन मुलांना पाठवू नये. शाळा आणि पालक यांच्यावर पुढची पावले कशी टाकायची याचा निर्णय आहे. काही जिल्ह्यांनी आणखी १० दिवसानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री लवकरच सक्रिय… 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे प्रत्यक्ष हजर राहू शकले नाही. त्यामुळे भाजपने टीका केली आहे. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती आता उत्तम आहे. लवकरच ते अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे, ते शिवसैनिक आणि जनतेशी संवाद सुद्धा साधणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.  तसेच, ‘एमपीएससी परीक्षाबद्दल माहिती घेतली जाईल. जिथे चूक असेल तिथे न्याय दिला जाईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा गोव्यातही प्रशांत किशोरच! टीएमसीमुळे काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात! काय आहे गोव्याचे भविष्य?)

विरोधकांना टोला 

‘विरोधी पक्षाकडे लक्ष देण्याची गरज नाही. सतत आरोप प्रत्यारोप विरोधी पक्षाकडून सुरू असतात. विरोधी पक्षाचे कामच टीका करण्याचे असते. पण आम्ही आमच्या कामावर लक्ष देऊन आहोत. लोकांची आणि विकासाच्या कामावर आम्ही जास्त लक्ष देतो, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. नुकत्याच आलेल्या सर्वेत मुख्यमंत्री टॉप फाइव्हमध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा लोकांनी पसंती दिली आहे. जनता आमच्यासोबत आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here