धोकादायक झालेल्या पोलीस वासहतीच्या पुनर्विकासाबाबत सर्वंकष धोरण तयार करणार – मुख्यमंत्री

89

मुंबई आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत लवकरच सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बोरिवली पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या पोलीस वसाहतीला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या इमारतीच्या स्थितीची पहाणी केली.

कुटूंबे जीव मुठीत धरून जगत आहेत

मुंबईतील अनेक पोलीस वसाहतींची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून, त्यात राहणारी कुटूंबे जीव मुठीत धरून जगत आहेत. ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन पाहिली तसेच पोलीस कुटूंबियांशी संवाद साधून त्यांची अडचण जाणून घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, पोलीस वसाहतींचा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित असून त्यावर तोडगा काढण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मागे याबाबत धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर या प्रश्नात पुन्हा एकदा लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. यासाठी लवकरच गृह विभागातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांसोबत या विषयावर बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

(हेही वाचा ‘पालापाचोळ्यांनीच इतिहास घडवला आहे’, मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर)

पोलिसांच्या घरांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला

पोलीस वसाहतींची माहिती घेतल्यावर त्यात राहणाऱ्या पोलीस कुटूंबियांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. लवकरात लवकर तुमच्या घरांचा प्रश्न सोडवला जाईल, तसेच पोलिसांच्या घरांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, मनीषा चौधरी, सुनील राणे, रवींद्र फाटक, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.