भाजपाच्या विजयावर मुख्यमंत्री Yogi Adityanath यांचे विधान; म्हणाले, “दिल्लीत खोटेपणा आणि लुटीच्या राजकारणाला पूर्णविराम”

64

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi assembly election result 2025) चित्र आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करणार आहे. निकालात भाजपा ४८ जागांवर आघाडीवर आहे  तर आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) २२ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान दिल्लीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांपासून सतत सुरू असलेले सुरक्षा, सुशासन आणि लोककल्याणाचे कामे यामुळे भाजपाचा दिल्लीत विजय झाला आहे. दिल्लीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे आणि सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. अडीच दशकांनंतर दिल्लीत कमळ फुलवल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय नेतृत्वाचे मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीत खोटेपणा आणि लुटीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळाला आहे. यामुळेच आता आपल्या राजधानी दिल्लीतील लोकांनाही लोककल्याणकारी धोरणांचा फायदा होईल. (Yogi Adityanath)

(हेही वाचा – ITC Hotels Share Price : आयटीसी हॉटेल्स कंपनीचे शेअर बीएससी निर्देशांकातून हटवले)

मिल्कीपूर मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या विजयाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, चंद्रभान पासवान यांच्या विजयाबद्दल मी भाजपा आणि सहयोगी पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि अयोध्येच्या मिल्कीपूर विधानसभेच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. 

मुख्यमंत्री योगी म्हणाले-दिल्लीला फायदा होईल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आपल्या राष्ट्रीय राजधानीला आता सुशासन, विकास आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल. याचा फायदा दिल्लीला ही होईल तसेच गेल्या ११ वर्षात दिल्लीत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दिल्ली खूप मागे पडली आहे.

(हेही वाचा – नवी मुंबई शहर बनले Drugs चे ‘हब’; एनसीबीच्या कारवाईत २०० कोटींचे अमली पदार्थ जप्त)

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्या, ‘हे नरेंद्र मोदींच्या कामाचे परिणाम आहे.’ दिल्लीतील लोकांनी निकालाच्या दिवशी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) म्हणाले, ‘दिल्लीतील लोक गेल्या ११ वर्षांपासून त्रास सहन करत होते. जनतेचा भाजपाच्या धोरणांवर विश्वास आहे. येणाऱ्या काळात भाजपाकडून दिल्लीतील जनतेला सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातील. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी याला विकास आणि सुशासनाचा विजय असे वर्णन केले आहे. सोशल मीडियावर त्यांनी लिहिले की, लोकशक्ती सर्वोच्च आहे! विकास जिंकला, सुशासन जिंकले. भाजपाला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल दिल्लीतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा सलाम आणि अभिनंदन! तुम्ही दिलेल्या भरपूर आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे. 

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.