भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: केअर टेकरसह तिघे दोषी

130

मध्य प्रदेशातील प्रसिद्ध राष्ट्रसंत भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर न्यायालयात शुक्रवारी अंतिम सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, इंदूर न्यायालयाने मुख्य सेवक विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना दोषी ठरवले आहे. या सर्वांना प्रत्येकी 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशात असे म्हटले आहे की, भैय्यू महाराज यांचा त्यांच्या नोकरदारांनी इतका छळ केला की त्यांनी आत्महत्या केली.

साडेतीन वर्षांनंतर न्यायालयाने दिला निकाल

साडेतीन वर्षांच्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने हा निकाल दिल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणावरील  खटल्यादरम्यान 32 साक्षीदारांच्या सुनावणीच्या वेळी जबाब नोंदविला गेला. उच्च न्यायालयाने हा गुन्हा सिद्ध केला आहे. महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांचे सेवक शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक यांना शिक्षा सुनावली आहे. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असून त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले, असेही न्यायालयाने सांगितले. याप्रकरणी १९ जानेवारीला साडेपाच तास सुनावणी झाली. यामध्ये भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा निकाल २८ जानेवारीला सुनावण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांचे मुख्य सेवक विनायक, शरद आणि पलक बराच काळ तुरुंगात आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात दोन सत्रांत साडेपाच तास सुनावणी झाली.

(हेही वाचा – पदोन्नतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालय म्हणालं, माहिती गोळा केल्याविना आरक्षण नाही)

अखेर भय्यू महाराजांनी आत्महत्येचा निर्णय घेतला

भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वतःच्या कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. भैय्यू महाराजांना कुटुंबापेक्षा जे त्यांचे सेवक होते, त्यांचावर त्यांचा सर्वाधिक विश्वास होता. त्यामुळे भय्यू महाराजांनी त्यांचा आश्रम आणि काम त्यांच्याकडे सोपवले होते, त्याच सेवेकरांनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की त्यांना अखेर आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.

असा झाला युक्तिवाद

आरोपी विनायकच्यावतीने अधिवक्ता आशिष चौरे यांनी युक्तिवाद केला. यापूर्वी दोन आठवडे सरकारच्या वतीने शरद आणि विनायक यांच्यात अंतिम चर्चा झाली होती. महाराजांनी स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ट्रस्टची जबाबदारी मुख्य सेवक विनायकवर सोपवण्यात आली होती, त्यांच्या नावावर असलेली संपत्ती नाही, असा युक्तिवाद मुख्य सेवक विनायकच्या वकिलाने केला. त्यामुळेच त्याला गोवण्यात आले आहे. घटनेच्या काही दिवसांपूर्वी भय्यू महाराज पुण्याला जात होते. त्यांना वारंवार कोणाचे तरी फोन येत होते, त्याचाही पोलिसांनी योग्य तपास केला नाही, अन्यथा योग्य आरोपी सापडला असता. यापूर्वी शरदचे वकील धर्मेंद्र गुर्जर यांनी दोन दिवसांत 10 तास तर पलकचे वकील अविनाश सिरपूरकर यांनी पाच दिवस युक्तिवाद केला होता. या खटल्यात 30 हून अधिक साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.