शी जिनपिंग नजरकैदेत, चीनमध्ये घडणार सत्तांतर?

112

एका बाजूला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग उजबेकिस्तानातील समरकंद येथे शांघाय सहयोगी संघटनेच्या बैठकीत गेले असताना दुसरीकडे चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत शी जिंगपिंग यांना सेना दलाच्या प्रमुख पदावरून हटवण्यात आले, तसेच बीजिंगमध्ये परतताच शी जिंगपिंग यांना विमानतळातच ताब्यात घेऊन घरातच नजरकैदीत ठेवण्यात आल्याचे वृत्त शनिवार, २४ सप्टेंबर रोजी जगभरातील सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरत पसरत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे. मात्र याला कोणत्याही अधिकृत वृत्त सेवेकडून दुजोरा मिळाला नाही, त्यामुळे ही अफवाही असू शकते, असे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक सांगत आहेत.

सुब्रह्मण्यम स्वामींचे काय आहे ट्विट? 

या विषयावर भाजपाचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये स्वामी यांनी, एक ताजी अफवा तपासण्याची आवश्यकता आहे. शी जिनपिंग यांना बीजिंगमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे का? शी जिनपिंग नुकतेच समरकंदमध्ये होते, तेव्हा असे मानले जाते की, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पक्षाच्या लष्करी प्रमुख पदावरून हटवले. त्यानंतर त्यांना अटक झाली. अशा स्थितीत अफवांचा फेरा सुरूच आहे.

(हेही वाचा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही – देवेंद्र फडणवीसांचा इशारा)

तर चीनच्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेन्ग यांनीही यासंबंधी ट्विट करत व्हिडिओ व्हायरल केला आहे. झेंग यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, चीनची लष्करी वाहने 22 सप्टेंबर रोजी बीजिंगकडे जात आहेत. बीजिंगजवळील हुआनलाई काउंटीपासून सुरू होणारी आणि हेबेई प्रांतातील झांगजियाकौ शहरात समाप्त होणार त्यांचा हा प्रवास ८० किमीचा आहे. दरम्यान, कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शी जिंगपिंग यांना लष्कराच्या प्रमुख पदावरून हटवले असल्याची अफवा पसरत आहे. तसेच त्यांना अटकही करण्यात आली आहे.

शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या अफवा चीनशी जोडलेल्या अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ आणि माजी पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी सॉन्ग पिंग यांना सेंट्रल गार्ड ब्युरोची जबाबदारी स्वीकारण्यासाठी राजी केल्याचेही म्हटले आहे. तसेच चीनचे लष्कर प्रमुख ली क्वामिंग हेही चीनचे राष्ट्राध्यक्ष होण्याच्या तयारीत असल्याची अफवा सोशल मीडियात पसरत आहे. शी जिनपिंग समरकंदहून परतले तेव्हा त्यांना 16 सप्टेंबर रोजी विमानतळावरूनच ताब्यात घेण्यात आले होते. चीनमधील अनेक विमान उड्डाणे रद्द झाल्याचा दावा केला जात आहे.

(हेही वाचा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान PFI ने रचला होता हल्ला करण्याचा कट? ईडीचा दावा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.