चिनी अर्थव्यवस्थेच्या फुग्यातील हवा निघाली… ‘या’ कंपनीचे निघाले दिवाळे

त्यामुळे चीनचे आता लवकरच कॅार्पोरेट पतन होण्याचे चित्र आहे.

101

चीनने आतापर्यंत सगळ्याच बाबतीत केलेले खोटे दावे अनेकदा जगासमोर आले आहेत. आर्थिकदृष्ट्या समृद्ध असल्याचं जगाला दाखवत आपण आर्थिक महासत्ता असणा-या देशांच्या रांगेत बसण्यास सज्ज असल्याचं नाटक करणा-या चीनची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे.

जगातील सर्वात मोठ्या मालमत्ता विकासकांपैकी एक असलेल्या चायना एवरग्रँड ग्रुपने गेल्या आठवड्यात आपण गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यास असमर्थ असल्याचं आणि त्यासाठी संघर्ष करत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे चीनचे आता लवकरच कॅार्पोरेट पतन होण्याचे चित्र आहे.

शेअर्समध्ये झाली घसरण

चीनच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. त्यामुळे आता चिडलेल्या गुंतवणुकदारांनी जायंट एव्हरग्रॅंडच्या मुख्यालयात जमून गोंधळ घातला आहे. आता या कंपनीने समोर येऊन कबुल केले की त्यांना खूप अडचणी आल्याने ते गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यास असमर्थ आहेत. एव्हरग्रँडच्या शेअरमध्ये 2014 नंतर 2021 पर्यंत 80 टक्के घसरण झाली आहे.

एव्हरग्रॅंडने त्याच्या आर्थिक उत्पादक धारकांसाठी परतफेडीचे नवीन पर्याय सुचवले आहेत. गुंतवणुकदारांना रोख हफ्ते वा खरेदी केलेल्या निवासी युनिट्सची मालमत्ता दिली जाईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. कंपनीने कर्जाच्या समस्या दूर करण्यासाठी आर्थिक सल्लागारांची नेमणूक केल्याचंही अधिका-यांनी सांगितलं आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चिनी नागरिक आपले पैसे परत मिळवण्यासाठी एव्हरग्रँडच्या आवारात जमले आहेत.

चीनमधील कम्युनिस्ट सरकार तेथील पैशांवर, कॅार्पोरेट बोर्डरुम, माध्यमं तसेच समाजाची मुस्कटदाबी करत असते. त्यामुळे चिनी सरकार या प्रकरणातसुद्धा या नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.