चिनची विस्तारवादी भूमिका कायम आहे. लडाखमधील सीमा प्रश्नावर चर्चा सुरु असतानाच, चीनने भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणा-या ‘चिकन नेक’ जवळ आगळीक केली आहे. भूटानच्या बाजूने असलेल्या डोकलामजवळ चीनने एक गाव वसवले असल्याचे, सॅटेलाइट फोटोमधून समोर आले आहे. हे फोटो मेक्सर कंपनीने घेतले आहेत. मेक्सर कंपनी अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
डोकलाम ट्राय- जंक्शनवर वर्ष 2017 मध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. जवळपास 73 दिवस तणाव कायम होता. त्यावेळी चीनने डोकलाम भागात रस्ता निर्मितीचे काम हाती घेतले होते.
( हेही वाचा: मंत्रीपद मिळवून देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटींची मागणी; 4 जणांना अटक )
तिसरे गाव वसवण्याचे प्रयत्न सुरु
नवीन सॅटेलाइट फोटोनुसार, अमो चू नदीच्या खो-याजवळ चीन हे गाव वसवत आहे. या ठिकाणचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्याशिवाय चिनने दक्षिण क्षेत्रात तिसरे गाव वसवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या फोटोमध्ये सहा इमारतींचा पाया रचला असल्याचे, दिसून येत आहे. त्याशिवाय, इतर बांधकामेही सुरु असल्याचे फोटोत दिसत आहे.
Join Our WhatsApp Community