मुंबई प्रतिनिधी
सामना वृत्तपत्रात (Samana Editorial) छापून आलेल्या अग्रलेखाला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Praveen Darkar) यांनी शनिवारी ट्विट करून, ‘चिंगम’ संजय राऊत यांनी ‘सिंघम’ देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये, अशा परखड शब्दात चोख प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न असून ही थुंकी खासदार राऊत यांच्याच तोंडावर पडल्याचा उलट पलटवारही आमदार दरेकर यांनी केला. (Praveen Darkar)
आमदार दरेकर (Praveen Darkar) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे कि, महाराष्ट्रातील स्वयंघोषित चघळून चोथा झालेल्या ‘चिंगम’ खासदार संजय राऊत यांनी ‘सिंघम’ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये. ज्यांनी आयुष्यभर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीय तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे गटप्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची ‘चमचेगिरी’च केली त्या खासदार राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार? धर्मवीरची पटकथा लिहिणं आणि सामनाच्या अग्रलेखातून ‘चमचेगिरी‘ करणं यात फरक असतो, असा मार्मिक टोलाही त्यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आधुनिक अभिमन्यू असून तुमच्यासारख्या कितीही कपटी ‘शकुनीं’नी त्यांना घेरलं तरी तुमचं ‘चक्रव्यूह’ भेदण्यासाठी ते सक्षम आहेत.त्यामुळे तुम्ही देवेंद्रजींच्या चित्रपटाची काळजी करू नका. देवेंद्र फडणवीस जी पटकथा लिहितील तो चित्रपट सुपरहिट होईलच, असा दावाही आमदार दरेकर (Praveen Darkar) यांनी केला.
(हेही वाचा – आजचा भारत घरात घुसून मारतो; पण काँग्रेस…; PM Modi यांचा हल्लाबोल; सर्जिकल स्ट्राईकला ८ वर्षे पूर्ण)
पण त्यापूर्वी पत्राचाळीत ज्या मराठी माणसांची घरं तुम्ही हडप केलीत त्यावर ‘पत्राचाळीचा लुटारू राऊत’ (Sanjay Raut) या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल? याचा विचार करा. त्यावेळी मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी त्यात तुम्ही जी खलनायकाची भूमिका वठवलीत ती महाराष्ट्रातील जनता अजून विसरलेली नाही. त्याच्या विरुध्द देवेंद्र फडणवीस हे इन्फ्रामॅन आणि महाराष्ट्राचे नायकच असून त्यासाठी संजय राऊत सारख्या ‘नालायका’च्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचा सणसणीत टोलाही आमदार दरेकर यांनी लगावला.
हेही पाहा –