सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देणार असल्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे. या विमानतळाच्या निर्मितीपासूनच विमानतळाच्या नावाचा मुद्दा चर्चेत होता अखेर राज्य सरकारने बॅ. नाथ पै यांचे नाव या विमानतळाला देण्याची घोषणा केली आहे.
( हेही वाचा : देशभरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आता ‘आभा हेल्थ कार्ड’; ऑनलाईन करा नोंदणी)
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देणार
चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळाली आहे. या बैठकीत चिपी विमानतळाचे नामकरण, पोलीस भरती, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले. २५ सप्टेंबरला बॅरिस्टर नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चिपी विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी कोकणवासीयांनी केली होती.
Join Our WhatsApp Community