सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून मोठ्या प्रमाणात राजकारण तापले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्याची गरज नाही, असे म्हटले. त्यामुळे चिपी विमानतळ हा प्रतिष्ठेचा विषय बनला होता. ९ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आयआरबीने प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे, तर ज्या कार्यक्रमावरून राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे महत्व कमी केले होते, त्या राणे यांचे नाव थेट तिसऱ्या क्रमांकावर टाकण्यात आले आहे.
राजशिष्टाचारानुसार कार्यक्रम पत्रिकेत क्रमवारी!
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याची कार्यक्रम पत्रिकाही छापण्यात आली आहे. या कार्यक्रम पत्रिकेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचे नाव सर्वात वर आहे. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव आहे. तर राणेंचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.
(हेही वाचा : काँग्रेसवाले मेले होते, उद्धव ठाकरेंमुळे जिवंत झाले! सेना समर्थक आमदारामुळे आघाडीत बिघाडी)
अखेर राणे पाहुणेच!
राजशिष्टाचारानुसार या कार्यक्रम पत्रिकेत हा क्रम देण्यात आला आहे. या आधी राणेंनी चिपीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आलेच पाहिजे, असे काही नाही असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर हा प्रोटोकॉल म्हणजे राणेंसाठी चपराक असल्याचे मानले जात आहे. याआधी नारायण राणे या विमानतळाच्या उद्घाटनावरून आरोप प्रत्यारोप सुरु केले होते. हे विमानतळ शिवसेनेच्या प्रयत्नाने नव्हे तर आपल्याच प्रयत्नाने उभे राहिले आहे, असा दावा राणे यांनी केला होता. तसेच या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे यांनीही शिवसेना पक्षाला टार्गेट केले होते. तर शिवसेनेचे नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी हे विमानतळ महाराष्ट्राच्या मालकीचे आहे, त्यामुळे मुख्यमंत्री हे यजमान असतील, अन्य पाहुणे म्हणून येतील, असे म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community