…तर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडू! चित्रा वाघांचा इशारा 

129

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात जळगावातील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे आहेत, असे वक्तव्य केल्याने वादात सापडले. आता यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत यांनाही सुनावले आहे. संजय राऊत शिवीगाळ करून उजळ माथ्याने फिरतात, तर गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसतात, या दोघांच्या विरोधात विरोधात गुन्हा दाखल करा, अन्यथा गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

गुलाबराव पाटील हा राज्याचा पाटील आहे. शिवसेनेच्या नेत्यांना नेमकं काय झाले आहे? संजय राऊतांनंतर आता गुलाबराव पाटील यांनी खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. गुलाबराव पाटील आणि रांझ्याचा पाटील यांची वृत्ती एकच आहे. रांझ्याच्या पाटलाची पाटीलकी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती. सरकार गुलाबराव पाटलांचं मंत्रीपद काढून घेणार आहे का? सर्वज्ञांनी संजय राऊत शिवीगाळ करूनही उजळ माथ्यानं महाराष्ट्रभर फिरत आहेत. दुसरीकडे गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसत आहेत, पण महाराष्ट्राच्या पोलिस यंत्रणांना यात महिलांचा विनयभंग दिसत नाही. हे दुर्दैव आहे. माझे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आवाहन आहे की या गुलाबराव पाटलांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

(हेही वाचा मलिकांना पुन्हा झाली पाहुण्यांची आठवण! म्हणाले…)

गुलाबराव पाटलांची माफी

याप्रकरणी गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील एका कार्यक्रमात मी रस्त्यांबाबत वक्तव्य केले होते. चांगले रस्ते असावेत अशी अपेक्षा त्यामागे होती. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे मंत्री पाटील म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.