संजय राऊतांवर शारीरिक, मानसिक आघात झाल्याचे परिणाम; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

109

संजय राऊत हे खूप मोठ्या गॅपमधून बाहेर आले. त्यांच्यावर शारीरिक मानसिक आघात तिकडे होत असावेत, त्याच्या परिणाम दूरगामी असतो. त्यातून ते अजूनही बाहेर आले नाहीत. त्यामुळे ते अशा पद्धतीचे वक्तव्य करत राहतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. शिंदे – फडणवीस सरकार जोरदारपणे काम करत आहे. सरकार जाणार याबाबत मला काही माहिती नाही. पण संजय राऊत यांची झोप झाली नाही. त्यांना झोपीची गरज आहे. झोप झाली की ते जागेवर येतील, ते व्यवस्थित बोलतील. शिंदे- फडणवीस सरकार हे फेसबुकवरच ऑनलाइन सरकार नाही लोकांच्या फेसवरती स्माईल आणणारे सरकार आहे. ऑनलाइन सरकार नाही ऑनफीड सरकार आहे, असा हल्लाबोल भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला.

महिला आयोगाच्या अध्यक्षांना टप्याटप्प्याने प्रश्न विचारणार 

हा जो काही नंगानाच किंवा व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर चाललेला स्वराचार हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या पवित्र महाराष्ट्रामध्ये खपवून घेणार नाही. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही आमची भूमिका मांडली. आम्ही पोलिसांकडे गेलो आमचे काम चालू आहे. त्यांना कोणी गूळ – खोबर देऊन आमंत्रण दिल नव्हते यामध्ये पडायला. आमचा आक्षेप अयोग्य नाहीच. अयोग्य आणि त्याचा वरतीही, या आधी खूप महिलांनी काम केल आहे. आयोगाने जे नोटीस पाठवली आहे. असल्या 56 नोटीस आम्हाला रोज येतात. एकटा अध्यक्ष म्हणजे आयोग नाही त्याला इतर ही सदस्य असतात, जे नोटीस दिली कोण्याच्या सदर्भावरून दिली का वैयक्तिक पाठवली आहे? येणाऱ्या दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्वच प्रश्न आम्ही त्यांना विचारू, असे भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे मोठ्या  नेत्या आहेत. त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगावे. सुषमा अंधारे या रुपाली चाकणकर यांच्याच कॅटेगिरीतील आहेत. ते काही ही बोलू शकतात, असेही त्या म्हणाल्या.

(हेही वाचा कारगिल युद्धाच्या विजयगाथा सांगताना परमवीरचक्र सन्मानित योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितले थरारक अनुभव)

अजित पवारांची भूमिका योग्य 

महिला विषयांच्या भूमिकेबद्दल मला अजितदादांची रोख ठोक भूमिका मला आवडली. अजितदादा म्हणाले महिला महिलांचे चालू आहे. आम्ही महिलांना संधी देतो आमच्या पक्षातील महिलांना संधी देतो. आता त्यांनी त्याचे सोने करायचे का राख करायचे ते त्यांनी ठरवायचे. पण अजितदादांच्या लक्षात येत चालले आहेत. राख होत चालली माती होत चालली आहे. दादांची ही भूमिका मस्त आहे आणि त्याच स्वागत आहे. त्यांचा स्वभाव रोख ठोक आणि सरळ बोलणार आहे. त्यांना जे बोलायचं होत ते बोलले आहेत. दादांनी बोलल्यानंतर खा. सुप्रिया सुळे काय बोलणार असतील तर त्यांनी सांगावं दादांना आपल्या मुली बाळी समोर कोणता आदर्श ठेवायचा याच्या विचार त्यांनी करायला पाहिजे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस सक्षम नेता 

एकेकाळी मी शरद पवार यांच्या सानिध्यात काम केले आणि आता मी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत काम करत आहे. देवेंद्र फडणवीस एक व्हिजन असणारा नेता आहे. महाराष्ट्राला एका यशाच्या शिखरावर पोहोचवणारा नेता असेल तर एकमेव देवेंद्र फडणवीस आहे. आणि ते आमचे नेते आहेत त्याचा आम्हला प्रचंड अभिमान आहे. शरद पवार हे तर आहेतच 50- 55 वर्षापासून राजकारणात आहेत. त्यांच्या वेळेचे राजकारण वेगळं होतं आणि आत्ताचे चॅलेंजर्स वेगळे आहेत. आता भारत कुठेतरी महासत्ता होण्याच्या दिशेवरती आहे.  त्याला नरेंद्र मोदी लीड करतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम नेता महाराष्ट्र सारख्या प्रोग्रेसिव्ह राज्यातून आपले योगदान देत आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो.  हे समाधानाची बाब आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.