संजय राऊतांवर चित्रा वाघ यांचा ट्विटर ‘वार’!

राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले आहे, त्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे शायरी करत शिंदे गटाला शालजोडीतील हाणले, त्यावर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही ट्विटर द्वारेच राऊत यांच्यावर ‘ वार’ केला आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ‘रुकने वाला वजह धूंडता हैं… र जाने वाले बहाने… राहत..’ असे ट्विट केले होते.

(हेही वाचा सगळे सोबत आहेत ना रे बाबा…उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना घातली साद)

यावरून आता भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. ‘काय ती शायरी, काय ती अदाकारी, काय ती गुर्मी…वाट्टोळं एकदम ओके’, असे म्हणत टीका केली आहे.

तसेच मुंबईतील पावसावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. नालेसफाईच्या ऐवजी महापालिकेची तिजोरी सफाई झाली, जनता हिशोब करणारच…दोन दिवसाच्या पावसाने मुंबईची अक्षरशः तुंबई झाली आहे. शिवसेना प्रणित मुंबई महानगरपालिकेने कोट्यावधी खर्च करून केलेली नालेसफाई, पाणी उपसा करण्यासाठी लावलेले पंप या पावसात वाहून गेले आहेत. नालेसफाईच्या ऐवजी महापालिकेची तिजोरी सफाई झाली. पंप लावून टक्केवारीचा उपसा केला….जनता हिशोब करणारच…असे देखील चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा धक्कादायक! आसाममध्ये आता ‘फ्लड जिहाद’! नदीचा प्रवाह सोडला शहरात)

तर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत, ‘नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं…आता शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेतून देखील तोंड काळे करण्याची तयारी ठेवावी…, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here